Visit Our New Site Go To!

सिंह राशीच्या भविष्य


आरोग्याची काळजी आवश्यक

(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

संपूर्ण ग्रहमालेच्या केंद्रस्थानी असणारा सूर्य स्वामी असलेली सिंह ही प्रथम दर्जाची राजराशी आहे. राशीचक्रातील ही पाचवी रास सूर्यासारख्याच प्रखर व्यक्तिमत्वाच्या लोकांची रास आहे. राजे, अनेक मोठे प्रशास् कीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील प्रणेत्या लोकांमध्ये ही रास पहावयास मिळते. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर परिवाराची जबाबदारी उचलणारे अनेक लोक या राशीचे असतात. वनराज सिंह हे या राशीचे चिन्ह आहे. महातेजस्वी, शूर, पाहसी, अधिकारपदे भूषविणारे लोक, स्वतंत्र वृत्ती, नव्या विचारांना चालना देणारे लोक या राशीत आढळतात.

सिंह राशीचे लोक अग्रदूत मानले जातात. कमानी त्यांच्या रक्तात असते. स्वावलंबी व निसर्गतः उस स्वभावही या लोकांमध्ये पहावयास मिळतो. आकर्षक देहवारी करारी व्यक्तिमत्व, प्रचंड महत्त्वाकांक्षी असणारे हे लोक वक्तशीर, मेहनतीची आवड असणारे, व्यवस्थित व उत्तम व्यवस्थापन करणारे असतात. हे विवेकी व समन्यायी असतात. उदार असतात. व्यवहारात खानदानीपणा असतो. मोठ्या घराण्यातील कर्तबगार वली, समाजभूषित व्यक्ती, राजकारणी, अंमलदार, लष्करी अधिकारी, न्यायाधीश, दंडाधिकारी, तहसीलदार, इंजिनिअर्स, तपास अधिकारी अशा मोठ्या हुद्द्यावरील लोकामध्ये सिंह रास आवर्जून पहावयास मिळते. प्राप्त ग्रहयोग पाहता आगामी वर्षात स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे आपणास

प्रकानें सुचवावेचे वाटते. व्यावसायिक आणि सामाजिक स्तरावर देखील प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करावी लागेल, तरच या वर्षात आहे ती परिस्थिती टिकवून ठेवता येऊ शकेल. आपल्या राशीचा स्वामी रवि नववर्ष प्रवेश कुंडलीत पराक्रम स्थानात स्वतःच्या तुला या नीव राशीत चंद्र,

योगकारक मंगळ व मारकेश युधासोबत आहे, तर पष्ठ या अनारोग्याच्या स्थानात शनि व गुरु आहे. पापग्रह

राहू देखील अध्मात आहे. ही ग्रहस्थिती पाहता आरोग्याबाबत सतर्क रहावयास हवेच. रवि व मंगळ हे त्यांचा

शत्रू शनिच्या दृष्टीने विकल अवस्थेत असल्याने ते या वर्षी आपणास विशेष लाभ देऊ शकतील असे वाटत नाही. उलट आरोग्याबाबत ते उपद्रव निर्माण करणारे ठरू शकतात. आर्थिक बाबतीत मात्र ते तटस्थ राहतील. त्यामुळे आर्थिक स्थिती यावर्षी जैसे थे राहण्याची शक्यता आहे. परिस्थिती हाताळण्याचे आपले कौशल्य आणि अडचणींचा सामना करण्याचे बळ कामी आणा. प्रथम ३० नोव्हेंबर २०२३ च्या गुरु राश्यांतरानंतर बदलाचे वारे वाहू लागतील व पुढे १३ एप्रिल २०२३ च्या गुरुच्या मीनेतील राश्यंतरानंतर परिस्थिती सुधारावयास हवी.. या ग्रहस्थितीमुळे कौटुंबिक स्तरावर काही मानसिक चिंता निर्माण होऊ शकाते, विद्यार्थी दशेतील मुलांच्या प्रगतीचा वेग मंदावू शकतो. १२ एप्रिल २०२२ च्या राहू राश्यातरानंतर हा त्रास वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील स्त्री वर्गाच्या प्रकृतीबाबतही चिंता निर्माण होऊ शकते. नोकरी-व्यवसायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या

युवकांना यंदा सहजासहजी काही मिळण्याची अपेक्षा बाळगून चालणार नाही.

सिंह राशीचा स्वामी रवि असून त्याचे माणिक हे रत्न सोन्याच्या अंगठीत परिधान करणे या मंडळींना सामान्यतः शुभ असते, तथापि शनिची नाराजी दिसत असल्यामुळे त्याचीही मनधरणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शनिच्या मंत्राचा जप, स्तोत्रांचे पठन, दान आदि उपाय करायला हवेत. शनिवारी शनिची उपासना करण लाभप्रद ठरेल, मंगळ आपला योगकारक ग्रह आहे. त्यामुळे विघ्नहर्ता सुखकर्ता गणपतीला विनवणे देखील लाभदायक ठरू शकते.

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.