तुझे प्रेम
तुझे प्रेम इतुके गडे भारलेले ।
तुझ्यावीण अस्तित्व ना राहिलेले ।।
तशी कुंपणे सर्व ओलांडलेली ।
अमर्याद मी तुज असे वाहिलेले ।।
गडे तूच आकाश माझे सुखाचे ।
तुझे गान ओठी-मनी दाटलेले ।।
अता तूच उर्मी मला चालण्याला ।
तुझ्या चिंतनाने मना वेढलेले ।।
नको काही मजला दुजे येथ आता ।
तुझे वेड माझ्या जिवा लागलेले