आपण पुस्तकांबद्दल बोललं पाहिजे. हे कंपल्सरी, कारण प्रायण समजतो
किंवा लोक, हा लेखक. त्या न्यायानं तरी । मग, लेखक प्रादेत हो' म्हणून माणसे दूर जातात.... मनात भिती की, न जाणो.. म्हणजे मग लेखकाच्या घरात ढिगांनी पुस्तकं असली पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे त्याने ती वाचली असली पाहिजेत. अपेक्षा त्या अपेक्षाच, वाचकांच्या लोकांच्या साध्या शब्दांत सांगितल्या सी.
अपेक्षाचे ओझे वाढतच जाते लेखकाविषयीच्या. त्याने फक्त लेखकच असावे. लेखकच राहावे. लेखकच जगावे.
•असलेली, आलेली सर्व पुस्तक त्यानं वाचलीच असावित. ती त्याला आवडली, पटलीच असावीत. त्यावर त्याची मतं असावीत त्याचे त्यानं कौतुकच करावं. टिका तर करूच नये
असे काही मंत्र-तंत्र असावेत का लेखकाविषयी ? किंवा काही व्याख्या तरी ? किंवा काही नियम वर्तणुकीचे ? पण मग त्याचं काय, ते लिहितात, संपादक छापतात त्याचं, आणि वाचकही असतात त्यांना.. फक्त ते नसतात कोणत्याही व्याख्येत परिभाषेत कधीच.
भांडण काढतात पुस्तक लेखकाशी वाद घालतात. अक्षरांचे मुजोर थवे लेखकाला धाप लागते अशात दग्याची... छातीत दाटून येतात कोरडे ढग लिहून थकलेल्या हातांनी पांघरूण घालतो लेखक बायको-पोरांवर, आणि संसारावर, थाडथाड उडणाऱ्या मेंदूला समजावतो लेखक झणाण् झोंबणाऱ्या तेलाच्या लालवेने. अधू-थकलेल्या डोळ्यांनी शोधत जातो काही बाही... काय ते त्यालाही कळलेले नाही. औषधांनी घेतला असतो ताबा आता लेखकाचा.
आणि वढत जाणाऱ्या रात्रीने, तो काय बोलणार आता पुस्तकांबद्दल ? पुस्तकंच बोलू लागतात. शिव्या घालतात. लेखकाला किंवा काय ते खरे त्यांनाच कळले असते
त्याच्या लेखनाला
आणि मूळ लेखकाला. निदान