महापूर कणखर पहाडांचे थरकापलेत पंख पायथ्याशी स्वप्नलीन अश्रापांना महाडंख कधी धरणाचा लोंढा कधी दरड कोसळे पीकं खरडली तरी कोंब जपावे कोवळे खेळ तुझा दयाघना पुरे आता आवरावे तुझी लेकरे चुकली त्यांना पोटाशी धरावे.